कै. सौ. आनंदीबाई द. तगारे बालक मंदिर सेवासदन सोलापूर येथे क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती. या क्रीडा स्पर्धांमध्ये माता पालकांचाही सहभाग घेण्यात आलेला होता. नर्सरी वर्गासाठी बादली चेंडू टाकणे हा खेळ घेण्यात आला होता. तसेच छोटा गट व मोठा गट या वर्गासाठी संगीत खुर्ची हा खेळ घेण्यात आला होता. तर संगीत खुर्ची खेळताना आई व मुलगी यांचा सहभाग घेण्यात आला होता. महिलांचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे लाभला. प्रथम क्रमांक आलेल्या महिला पालकांना बक्षीस देण्यात आले.