पुणे सेवासदन संस्था शाखा सोलापूर तर्फे विद्यार्थिनींसाठी शृंगेरी पिठाचे स्वामी शंकर भारती यांचे मार्गदर्शन


 इयत्ता नववीतील विद्यार्थिनींसाठी शृंगेरी पिठाचे स्वामी शंकर भारती यांचे मार्गदर्शन पर प्रवचन सेवासदन प्रशाला येथे आयोजित करण्यात आले होते डॉ. कमलापूरकर यांनी प्रास्ताविक सादर केले श्री. आद्य शंकराचार्य विरचित श्रीराम भुजंगप्रयात स्तोत्र पठण करण्यात आले सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री यांनी  स्वागत केले श्रीरामांचे चरित्र त्यांचे कार्य याविषयी विद्यार्थिनींना प्रश्न विचारण्यात आले श्रीराम चरित्रातून त्यांचे साधेपण त्याग अध्ययन करत असताना विद्यार्थिनींनी अंगीकारले पाहिजे असा संदेश त्यांनी विद्यार्थिनींना दिला. प्रशालेतील शिक्षक श्री .अमित देशपांडे यांनी संस्कृतचे महत्त्व व संस्कृत विषयाची गोडी स्तोत्रांमधून विशद केली.
      सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री, सचिवा वीणा पतकी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ .राजश्री रणपिसे उपमुख्याध्यापिका नंदिनी बारभाई पर्यवेक्षिका स्वाती पोतदार शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी संस्था कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचलन श्री अमित देशपांडे यांनी केले.