रोटरी इ-क्लब ऑफ सोलापूर इलाईट हा सोलापूर मधील नामवंत डॉक्टरांचा ग्रुप, यांच्यातर्फे प्रत्येक वर्षी शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांना ‘नेशन बिल्डर पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो.
यावर्षी चा हा ‘नेशन बिल्डर पुरस्कार’ सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथील सहशिक्षिका सौ. रश्मी जयंत कुलकर्णी यांना प्राप्त झाला. श्रीमती फोफलिया मॅडम यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी रोटेरियन डॉ. आदर्श गोयदानी, प्रेसिडेंट रोटेरियन डॉ. सचिन तोष्णीवाल, रोटेरियन डॉ. अल्पेश साबू हे उपस्थित होते.
शुक्रवार, दिनांक ०४/१०/२०२४ रोजी रंगभवन, सोलापूर येथे उत्साह पूर्ण वातावरणात पारितोषिक वितरण पार पडले.