‘रमाबाई रानडे यांनी स्वप्न पाहिले, ज्ञानाचे तव सेवासदनरूपी दिप लावले त्या दिपांचे तेज झळकले ,
सेवासदनी बालिकांचे जीवन फुलले
महाराष्ट्रातील सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजे सेवासदन ही शिक्षण संस्था कै . रमाबाई रानडे यांनी २ ऑक्टोबर १९०९ मध्ये पुणे येथे सेवासदन संस्थेची मुहूर्तमेढ रोवली . स्त्री शिक्षणाचा विस्तार करण्याच्या हेतूने मुंबई , नाशिक , नागपूर, सोलापूर या प्रमुख शहरांमध्ये सेवासदन संस्थेचा विस्तार झाला आणि स्त्रियांच्या शिक्षणाचे क्षितीज विस्तारले . पुणे सेवासदन संस्था शाखा सोलापूर येथे संस्थेचा ११५ वा वर्धापन दिन म.गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती हा त्रिवेणी संगम कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला गायनशिक्षक श्री .विलास कुलकर्णी सर व विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले . प्रमुख पाहुणे प्रार्थना फाउंडेशन चे सौ. अनु मोहिते व श्री. प्रसाद मोहिते व मान्यवरांच्या हस्ते म. गांधी , लाल बहाद्दूर शास्त्री व कै. रमाबाई रानडे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले . संस्थेच्या सचिव सौ . वीणा पतकी यांनी प्रास्ताविक सादर करताना सांगितले की मातृसंस्था पुणे सेवासदन संस्थेचा आज वर्धापन दिन आहे त्याबद्दल सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान करणाऱ्या समाजसेवी महिलेला दरवर्षी कै. रमाबाई रानडे पुरस्कार दिला जातो . मोरवंची येथे वृध्द , निराधार ,मनोरुग्ण , व्यक्तींना आधार देणारे मोहिते दांपत्य यांचा सेवाभाव उच्च कोटीचा आहे . समाजऋणाच्या जाणीवेतून अनुताई मोहिते यांचे कार्य चालू आहे . सेवासदन प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. स्वाती पोतदार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली . MSW शिक्षण प्राप्त सौ. अनु मोहिते व श्री . प्रसाद मोहिते यांनी सामाजिक कार्यासाठी स्वतःचे आयुष्य वाहून घेतले आहे . भिक्षेकरींनाअन्न ,वृद्धांना आधार देण्याचे त्यांचे कार्य अनन्यसाधारण आहे .संस्थेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला . प्रशालेच्या शिक्षिका सौ. अश्विनी वाघमोडे यांनी मानपत्राचे वाचन केले .
सौ. अनु प्रसाद मोहिते यांच्या सामाजिक कार्याची माहिती विद्यार्थिनींना मिळावी यासाठी त्यांची ‘मुलाखत’ घेण्यात आली प्रशालेतील शिक्षक प्रतिनिधी श्री .सतीश घंटेनवरू यांनी मुलाखत घेतली . मुलाखतीला उत्तर देताना त्यांनी सांगितले की प्रार्थना फाउंडेशन हे २०१८ मध्ये सुरु झाले .समाजातील गरीब ,भिकारी , अपंग , वृद्ध ,आजी आजोबा ज्यांचा कोणीच आधार नाही त्यांचा आम्हीआधार होतो .त्यांना झालेले कन्याअपत्य हे जन्मल्यानंतर लगेच देवाघरी गेले तेव्हा ‘प्रार्थना’ हेच मुलीचे नाव ठेवणार होते २१ फेब्रुवारी रोजी मुलीच्या स्मरणार्थ प्रार्थना फाउंडेशन ही समाजसेवी संस्था उभा केली . समाजातून मदत मिळते पण जर मदत नाही मिळाली तरीही दागिने गहाण ठेवून आश्रम चालू ठेवला आहे .
संस्थेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री यांनी मनोगतात सांगितले की आज म . गांधी जयंती , लाल बहाद्दूर शास्त्री जयंती व पुणे सेवासदन संस्था वर्धापन दिन साजरा करताना समाजसेवा व्रताला वाहून घेतलेले हे मोहिते दांपत्य यांनी त्यांच्या कार्यातील प्रकाशाचा किरण आपल्यापर्यंत पोहचवला । दुरितांचे तिमिर जावो । जो जे वांछिल तो ते लाहो ।या ज्ञानेश्वरांच्या पसायदाना प्रमाणे कार्य करीत राहावे .
विद्यार्थिनींनी वर्धापन दिनानिमित्त तयार केलेली शुभेच्छा पत्रे संस्थेस भेट देण्यात आली . पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली . कार्यक्रमप्रसंगी संस्था अध्यक्षा शीला मिस्त्री , सचिव सौ . वीणा पतकी , कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव प्रधान , कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य डॉ .सतीश कुलकर्णी सेवासदन प्रशाला मुख्याध्यापिका सौ . राजेश्री रणपिसे, उपमुख्याध्यापिका सौ. नंदिनी बारभाई , पर्यवेक्षिका सौ. स्वाती पोतदार , शिक्षक प्रतिनिधी श्री. सतीश घंटनवरू , प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. संजीवनी नगरकर , बालवर्ग विभाग मुख्याध्यापिका सौ .संगीता आपटे , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवक वर्ग ,पालक विद्यार्थिनी ,पत्रकार उपस्थित होते .
सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन प्रशालेच्या शिक्षिका सौ. संध्या सुतार यांनी केले.