राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये महावाचन महोत्सव राबवण्याचे शासन निर्णय द्वारे कळवण्यात आले . प्रशालेतील ५वी ते १०वी तील सर्व विद्यार्थिनीनी या उपक्रमात सहभाग नोंदवला .वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देऊन अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे सृजनशीलतेला वाव देऊन भाषा संवाद कौशल्ये जोपासणे या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबवण्यात आला . कु. तनया श्रीकृष्ण गोसावी कु प्रांजल चव्हाण , कु किर्ती कांबळे , कु. शब्द श्रुती कराड, कु.आर्या सुरडे श्रीशा धनराज धर्माधिकारी कु. श्रीषा पाटील कु श्रावणी कोकाटे , कु . प्रियदर्शनी गुंड, आरती सरवदे कु. ज्ञानेश्वरी जाधव कु. श्रावणी पाटील या विद्यार्थिनींनी पुस्तक परीक्षण लेखनात क्रमांक प्राप्त केले . शासनाच्या वतीने त्यांना प्रमाणपत्रे प्राप्त झाली मा. मुख्याध्यापिका सौ. राजेश्री रणपिसे यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली .
या महावाचन महोत्सवासाठी मराठी विभाग प्रमुख सौ. मीरा केंद्रे , सौ. लक्ष्मी कमळे ,मराठी विषय शिक्षक श्री. सतीश घंटेनवरू ,. श्रीमती स्वप्ना सहस्त्रबुद्धे, सौ. स्मिता कोर्टीकर, सौ. संतोषी सुरवसे , सौ .स्नेहल बागवडे, सौ. वर्धा माळगे , सौ. प्रियंका लाड श्रीमती अंजली शिरसी , सौ. बोरसे यांनी परिश्रम व सहकार्य केले .
कार्यक्रम प्रसंगी सेवासदन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. राजेश्री रणपिसे पर्यवेक्षिका सौ . स्वाती पोतदार, शिक्षक प्रतिनिधी श्री. सतीश घंटेनवरू व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .