सेवासदन प्रशालेत हिंदी दिन उत्साहाने साजरा


हिंदी दिनाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख पाहुणे आर्य समाज मंडळाचे श्रीप्रदीप आर्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरुवातीला स्वागत गीत गायनशिक्षक श्री विलास कुलकर्णी सर व विद्यार्थिनींनी सादर केले. भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रशालेतील शिक्षक श्री रेवणसिद्ध कट्टे यांनी करून दिली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ राजेश्री रणपिसेयांच्या हस्ते प्रमुख पाहुणे श्री.प्रदीप आर्य यांचा सत्कार करण्यात आला.कु. विजयालक्ष्मी झांबरे हिने हजारीप्रसाद द्विवेदी यांच्या जीवन व कार्य थोडक्यात सांगितले. कु. ऐश्वर्या वाघमोडे हिने मैथिली शरण गुप्त यांची माहिती सांगितली तृप्ती कोळेकर हिने लालची मित्र ही कथा सांगितली प्रज्ञा गुंड हिने ज्ञान का लाभ सांगितले इयत्ता सातवी तील विद्यार्थीनींनी मोबाईल मुळे मुलांवरील परिणाम या विषयावर नाटक सादर केले.6वी तील विद्यार्थिनींनी विज्ञापन जाहिरात सादर केली.5 वी तील विद्यार्थिनींनी देशभक्ती गीत सादर केले. प्रमुख पाहुणे श्री प्रदीप आर्य यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की हिंदी आपली राष्ट्र भाषा आहे. प्रत्येकाने हिंदी विषयाचा अभ्यास केला पाहिजे.

कार्यक्रम प्रसंगी सेवासदन संस्था अध्यक्षा शीला मिस्त्री, सचिव सौ. वीणा पतकीयांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. राजेश्री रणपिसे, उपमुख्याध्यापिका सौ. नंदिनी बारभाई, पर्यवेक्षिका सौ. स्वाती पोतदार, शिक्षक प्रतिनिधी श्री, सतीश घंटेनवरू, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. हिंदी विभाग प्रमुख सौ. मीनल उदनुर, सौ. वृषाली डोंगरे, सौ . खांडेकर हिंदी विषय शिक्षक सौ . मेकाले, सौ.माळगे, सौ.लाड, सौ.बागवडे, सौ.संतोषी सुरवसे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.