५ सप्टेंबर हा दिवस डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या देशात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
याचे औचित्य साधून सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून व विद्यार्थिनींनी भाषण सादर करून साजरा करण्यात आला. या भाषणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे गुण व आदर्श रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका मा. संजीवनी नगरकर यांनी ज्या शिक्षकांनी आपली शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता वाढवण्यासाठी शिक्षण घेतले त्यांचे कौतुक त्यांना भेट देऊन करण्यात आले. शाळेतील शिक्षिका श्रीमती कविता शिंदे श्रीमती प्रमोदिनी खजूरकर (DSM), सौ. सोनाली काशीद,वंदना ताटे (M.A), सौ. रेश्मा सावंत (M.A,गोल्ड मेडल) यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच प्रत्येक वर्षी प्रमाणे यावर्षीही इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बनून शाळेचा कारभार पाहिला व अध्यापन केले. विद्यार्थिनींनी अगदी परिपाठ पासून विविध विषय शिकवले. त्यामध्ये मराठी, गणित, इंग्रजी आणि खेळ यांची धडे दिले. त्यांच्या उत्साहाने आणि आत्मविश्वासाने वर्गात नवीन ऊर्जा निर्माण झाली. शिक्षकांच्या भूमिकेत त्यांनी उत्तम रीतीने शिकवले आणि इतर विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर केला. त्याचबरोबर शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी यांच्याही कार्याची ओळख झाली व तेही विद्यार्थिनींनी उत्तम रित्या पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न केला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण आणि जबाबदारीची भावना निर्माण झाली. शिक्षक दिनानिमित्त ही एक अनोखी आणि प्रेरणादायी संकल्पना होती, ज्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाबद्दल नवीन दृष्टिकोन विकसित केला.
अशा आनंददायी व हसत खेळत वातावरणात आजची शाळा भरली.