गणपती मूर्ती कार्यशाळा


सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे आज बुधवार, दिनांक ०४/०९/२०२४ रोजी इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थिनींसाठी गणपती मूर्ती तयार करण्याची एक अनोखी कार्यशाळा विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थिनींना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची प्रेरणा देणे हा होता. कार्यशाळेत मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. याचे प्रात्यक्षिक युवा शिल्पकार श्री. विनायक घाटगे, श्री. शैलेश कुडगुंटे आणि श्री. ओंकार खराडे यांनी मूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक शाळेतील इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थिनींना दाखवले. त्यांनी प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करून विद्यार्थिनींना मूर्ती घडवण्याचे तंत्र शिकवले. ज्यामुळे विद्यार्थिनींना मूर्ती घडवण्याची प्रक्रिया समजली. विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने स्वतःच्या हातांनी मातीचे गणपती बनवले आणि त्यांची सर्जनशीलता आणि कलाकौशल्याला वाव दिला. या कार्यशाळेमुळे पर्यावरणसंवर्धनाच्या दृष्टीने जागरूकता निर्माण झाली, तसेच पारंपरिक कला आणि संस्कृतीचे संवर्धन करण्याची महत्त्वपूर्ण शिकवण मिळाली.