सेवासदन प्रशालेमध्ये क्रीडा दिनानिमित्त विद्यार्थिनींच्या विविध क्रीडा प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले .हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका सौ. राजश्री रणपिसे ,उपमुख्याध्यापिका सौ .नंदिनी बारभाई, पर्यवेक्षिका सौ. स्वाती पोतदार, क्रीडा प्रमुख श्री .ज्ञानेश्वर काळे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थिनींना खेळाविषयी व खेळा मुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक स्वास्थ्य शरीराची चलन वलन लवचिकता याविषयी माहिती सांगण्यात आली व्यायामाचे प्रकार योगासनाचे प्रकार सूर्यनमस्कार यांचे महत्त्व विशद करून सांगण्यात आले खेळामुळे शिस्त हारजीत साठी मनाची तयारी यांची बाल वयात जडणघडण होते संघ वृत्तीस चालना मिळते.
कार्यक्रमासाठी सेवासदन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ .राजेश्री रणपिसे उप मुख्याध्यापिका सौ. नंदिनी बारभाई पर्यवेक्षिका सौ. स्वाती पोतदार शिक्षक प्रतिनिधी श्री. सतीश घंटेनवरू क्रीडा प्रमुख श्री .ज्ञानेश्वर काळे तसेच शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.