हर घर तिरंगा’ अभियान अंतर्गत सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे विविध उपक्रम घेऊन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आले.
विद्यार्थिनींनी आणि शिक्षकांनी विविध उपक्रमांनी देशभक्तीचे दर्शन घडवले. यानिमित्त विद्यार्थिनींची रॅली काढण्यात आली. विद्यार्थिनींनी रॅलीद्वारे देशप्रेमाची भावना जागवली.
इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनींनी स्वतः तिरंगा ध्वज बनवला. तसेच विद्यार्थिनींनी क्राफ्ट पेपर वापरून तिरंगा फुले बनवली, तिरंगा ध्वजाचे चित्र रेखाटून आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले.
विद्यार्थिनी व शिक्षकांनी मिळून तिरंगा प्रतिज्ञा घेतली.
इयत्ता चौथी ब च्या विद्यार्थिनींनी वर्गात देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करून आपल्या कला-कौशल्याचे सादरीकरण केले.
१३ ते १५ ऑगस्ट पालकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावले. ज्यासोबत विद्यार्थिनी व पालकांनी मिळून फोटो काढले.
तसेच 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन निमित्त पुणे सेवासदन संस्था, शाखा सोलापूर येथील सर्व विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून एकत्रित हा दिवस साजरा करतात.
यासाठी प्राथमिक विभगाच्या शिक्षिका सौ. वंदना ताटे व सौ. रेश्मा सावंत यांनी सुंदर रांगोळी काढून ध्वज कट्टा सजवला.
यात इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थिनींनी शिस्तबद्ध पद्धतीने कवायत संचलन केले.
तसेच या कार्यक्रमात पुणे सेवासदन संस्थेचे नवीन प्रतीक चिन्ह (logo) चे उद्घाटन करण्यात आले, ज्यामुळे हा दिवस अधिकच विशेष बनला. या सर्वच उपक्रमांनी सर्वांना प्रेरणा मिळाली आणि देशप्रेमाची भावना अधिकच बळकट झाली.