मंगळवार, दिनांक १६/०७/२०२४ रोजी सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी, आषाढी वारीचे सादरीकरण व वृक्षारोपण करण्यात आले.
आषाढी एकादशी म्हणलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो आपला ‘विठुराया’
“ज्ञानोबा माऊली तुकाराम” असा गजर करत तुकोबा आणि ज्ञानेश्वरांच्या पालखी सोबत पंढरीकडे निघालेले वारकरी, डोईवर तुळस घेऊन निघालेल्या स्त्री वारकरी.
ह्या आषाढी वारी ची सुरवात, इतिहास, संतांनी दिलेली एकात्मतेची शिकवण, स्त्रियांना समान हक्क मिळवून देण्यासाठी स्त्री संतांनी दिलेले योगदान, ह्या सर्व गोष्टी इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थिनींनी आषाढी वारीच्या सादरीकरणातून व्यक्त केले.
इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थिनींची दिंडी शाळेच्या शेजारी असलेल्या एन. जी मिल चाळीतून काढण्यात आली.
इयत्ता दुसरीच्या विद्यार्थिनींनी विठ्ठलावर आधारित गाण्यावर स्वतः नृत्य बसवले व सर्वांसमोर सादरीकरण केले.
विद्यार्थिनींना वृक्षारोपणाचे महत्त्व समजण्यासाठी त्यांच्या हस्ते बिया पेरून बिजारोपण करण्यात आले. यामुळे विद्यार्थिनी स्वतः आपल्या रोपाची काळजी घेतील, त्याच्या वाढीचे अनुभव घेतील व नवनिर्मितीचा आनंद घेतील. तुळशीच्या रोपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, यासाठीच विद्यार्थिनींनी तुळशीचे रोप शाळेस भेट दिले व त्याच्या संगोपनाचा निर्धार केला. तसेच काही विद्यार्थिनींनी सावली देणाऱ्या झाडांचे रोप शाळेस भेट दिले.
मुलींना गोड खाऊ देऊन आजच्या दिवसाचा समारोप करण्यात आला.