सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाची विज्ञान केंद्रास भेट


सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाच्या दशकपूर्ती महोत्सवा अंतर्गत इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींसाठी महाविद्यालयाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले.


या क्षेत्रभेटीच्या पहिल्या सत्रात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सोलापूर विज्ञान केंद्रातील विविध वैज्ञानिक प्रयोग व साहित्य यांचे निरीक्षण करत वैज्ञानिक संकल्पना समजून घेतल्या. याप्रसंगी मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक श्री. उमेश कुमार यांनी विज्ञान विषयावर मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रपती पुरस्कार विजेते श्री. सिद्धेश्वर म्हेत्रे यांनी उपस्थित विद्यार्थिनींना विज्ञान आणि गणिताचे प्रात्यक्षिक दाखवून वैज्ञानिक माहिती दिली. यावेळी विज्ञान केंद्राचे संग्रहालय अध्यक्ष श्री. राहुल दास व सहकारी सौ. ज्योती दास यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत सहकार्य केले.


क्षेत्रभेटीच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थिनींना अभियांत्रिकी शिक्षणातील विविध विभागांची माहिती घेता यावी, यासाठी केगाव येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयास भेट दिली. यावेळी सिंहगड कॉलेजचे प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. विनोद खरात यांनी विद्यार्थिनींनी विविध विभागांची सखोल माहिती दिली. याप्रसंगी सिंहगड कॉलेजचे प्राचार्य डॉ. शंकर नवले व डॉ. विनोद खरात यांचा सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शैक्षणिक क्षेत्रभेट यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. डॉ. तेजस्विनी मस्के, प्रा. सुजाता उपासे, प्रा. गायत्री कुलकर्णी, प्रा. सरस्वती सगर, प्रा. प्रिया माणेकरी व प्रा. ज्योती बटगेरी यांनी विशेष परिश्रम घेतले.