“जे जे आपणासी ठावे| ते ते इतरासी शिकवावे ,शहाणे करूनी सोडावे सकल जन |” अशा चांगल्या विचारांनी प्रेरित होऊन सेवासदन प्रशालेतर्फे रानफूल योजना राबवली जाते. एन जी. मिल चाळ मधील महिलांसाठी आरोग्य समस्या त्यावरील उपाय यावर तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विविध प्रयोगांद्वारे ९वी तील कु.श्रेया शर्मा, वैष्णवी चव्हाण, सोनल चव्हाण, श्रावणी गुंड, पूनम लगड, कु.दिशा बुरजे, कु. आर्या खरात, कु. वैष्णवी कदम, कु. सिया पवार, कु. किर्ती गायकवाड, कु. प्रांजली सोमवंशी , कु.राजनंदिनी माने या विद्यार्थीनींनी माहिती सांगितली. दैनंदिन जीवनातील व्यवहारातील विज्ञान,अंधश्रध्दा नष्ट करणे यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. उखाणे स्पर्धा घेण्यात आली.
बक्षीस पात्र महिला सौ. रुपाली सोमाजी, सौ.नागेश्वरी घोडके, सौ . प्रियांका फंड यांना बक्षिसे देण्यात आली .प्रशालेतील शिक्षिका सौ. रोहिणी निराळे व सौ. स्मिता कोर्टीकर यांनी कार्यक्रम प्रसंगी महिलांना ‘आहारातील विज्ञान’ याविषयी माहिती सांगितली . कार्यक्रमाची आखणी व कार्यवाही केली.
कार्यक्रमासाठी सेवासदन संस्था सोलापूरच्या सचिव सौ. वीणा पतकी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. राजेश्री रणपिसे,उपमुख्याध्यापिका सौ.नंदिनी बारभाई, पर्यवेक्षिका सौ. स्वाती पोतदार यांनी मार्गदर्शन केले.