सेवासदन प्राथमिक शाळा येथे प्रयोग सादरीकरणाचे बक्षीस वितरण


सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे आज गुरूवार, दिनांक २९/०२/२०२४ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्त आयोजित प्रयोग सादरीकरणाचे बक्षीस वितरण करण्यात आले.


विजेत्या मुलींना ट्रॉफी देऊन तर उपविजेत्या इयत्ता पहिली व दुसरी च्या वर्गातील मुलींना मेडल देऊन कौतुक करण्यात आले.
यामुळे या विद्यार्थिनींना पुढील प्रगतीस प्रोत्साहन मिळेल तसेच इतर विद्यार्थिनींना पुढील वेळेस स्वतः बक्षीस मिळवण्यास प्रेरणा मिळेल.
प्रथम क्रमांक प्राप्त झालेल्या विद्यार्थिनींची नावे –


इयत्ता १ली – सानिका शिदोरे
इयत्ता २री – श्रुती पाटील
इयत्ता ३री – स्वरा गवळी
इयत्ता ४थी – गौरी नलवडे


तसेच यासोबत उत्कृष्ट दिवाळी अभ्यास करणाऱ्या, सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या प्रत्येक इयत्तेतील एका मुलीस लेखन साहित्य देऊन कौतुक करण्यात आले.