विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सेवासदन प्रशालेमध्ये विज्ञान पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले तसेच विविध वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन मा.उपमुख्याध्यापिका सौ.नंदिनी बरभाई यांच्या हस्ते करण्यात आले.राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्त भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाचे प्रास्ताविक सौ. स्मिता कोर्टीकर यांनी केले. 5वी ते 9वी तील विद्यार्थीनींनी विद्यार्थिनींनी 20 वैज्ञानिक मॉडेल्स तयार केली होती,विविध वैज्ञानिक चित्रे तक्ते यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते . इयत्ता पाचवी ते नववीतील सर्व विद्यार्थिनींनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला .भौतिक शास्त्रात नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर सी. व्ही .रमण यांच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ. नंदिनी बारभाई यांनी केले .प्रशालेतील विद्यार्थिनी कु.आर्या गायकवाड व कु.स्वराली कुंभार यांनी डॉक्टर सी. व्ही .रमण यांच्या कार्याविषयी विषयी माहिती सांगितली.
वैज्ञानिकांनी केलेले विज्ञान क्षेत्रातील कार्य अतिशय महान आहे. प्रत्येक विद्यार्थिनींनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून नवीन नवीन शोध लावण्यासाठी सतत कार्यरत राहावे. असे उपमुख्याध्यापिका सौ .नंदिनी बारभाई यांनी सांगितलेसिंहगड कॉलेज च्या विद्यार्थीनींनी PPT द्वारे कृत्रिम बुध्दीमत्ता भविष्यातील फायदे तोटे, रोबोट, AI च्या मदतीने मानवी जीवन कसे सुकर होईल याविषयी माहिती दिली. प्रात्यक्षिकांसह विविध उपकरणांची माहिती विद्यार्थीनींना देण्यात आली. सौ. श्रुती मोहोळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचलन केले. सेवासदन संस्था सचिव सौ. वीणा पतकी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. राजेश्री रणपिसे, उपमुख्याध्यापिका सौ. नंदिनी बारभाई, पर्यवेक्षिका सौ. स्वाती पोतदार, प्रशालेचे विज्ञान प्रमुख श्री रेवणसिद्ध कट्टे, श्री अमित देशपांडे यांनी प्रदर्शनासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विज्ञान शिक्षक सौ. हजारे सौ. देशपांडे सौ. कोर्टीकर सौ. भुजबळ, सौ. नाईक यांनी परिश्रम घेतले.