सेवासदन प्राथमिक शाळा येथे ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा


सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे आज बुधवार, दिनांक २८/०२/२०२४ रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा करण्यात आला.

भारतासाठी पहिला असा जागतिक कीर्तीचा नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांच्या रामन इफेक्ट या वैशिष्ट्यपूर्ण संशोधनाची आठवण म्हणून आजचा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.

विद्यार्थिनींमध्ये विज्ञानविषयक जागरूकता निर्माण व्हावी, विज्ञान क्षेत्रात त्यांची प्रगती व्हावी, विज्ञानाची आवड आणि आकर्षण वाढावे, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा या साठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता १ली ते ४थी च्या विद्यार्थिनींनी विविध प्रयोग सादर केले. शाळेतील शिक्षकांनी प्रयोगाचे परीक्षण केले आणि प्रत्येक इयत्तेतून एक असे एकूण चार क्रमांक काढण्यात आले. विशेष सादरीकरण म्हणून ‘प्रदूषण रोखा’ या प्रयोगा ची निवड करण्यात आली. इ. १ली व २री च्या मुलींचे विशेष कौतुक म्हणून त्यांना वर्गातून एक असे मेडल देण्यात येणार आहे. ज्याचे बक्षीस वितरण उद्या सकाळी शाळेत करण्यात येणार आहे.

इयत्ता १ली व २री च्या प्रयोगाचे व्हिडिओ.

राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्त इयत्ता २री, ३री व ४थीचे प्रयोग