सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा


सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मराठी विज्ञान परिषद, सोलापूर विभागाचे अध्यक्ष तथा जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. व्यंकटेश गंभीर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. गंभीर म्हणाले की, गेल्या काही वर्षामध्ये भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाबरोबरच अवकाश संशोधनात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या प्रगतीमध्ये अनेक भारतीय वैज्ञानिकांनी बहुमोल योगदान दिले आहे. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि जिज्ञासा बाळगल्यास अनेक तरूणांना संशोधन क्षेत्रात खूप वाव आहे.


यावेळी सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी, प्रा. मधुरा गोगटे, शिक्षक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. सुजाता उपासे यांनी प्रमुख अतिथींची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सविता मादळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. योगिनी गायकवाड यांनी केले.