‘मराठी भाषा गौरव दिन’ (सेवासदन प्राथमिक शाळा)


सेवासदन प्राथमिक शाळा, सोलापूर येथे आज मंगळवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात आला.

मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.

या निमित्त शाळेत विद्यार्थीनींनी महाराष्ट्रीयन वेशभूषा साकारून मराठीविषयी कृतज्ञता व्यक्त केली. मुलींनी पारंपरिक महाराष्ट्रीय वेशभूषा घालून आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख करून घेतली.

‘मराठी माझा अभिमान- मराठी माझा स्वाभिमान’ मराठी भाषेचे महत्त्व व गौरवगाथा सांगण्यात आली. आजचा दिवसाचे महत्त्व समजून त्याचे लेखन सुंदर अक्षरात करण्यास सांगून हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली.

तसेच यानिमित्त शाळेत मुख्याध्यापिका व शिक्षकांतर्फे गोड खाऊचे वाटप करण्यात आले.