*सेवासदन संस्था सोलापूर येथे जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन*
जागतिक कर्करोग दिनानिमित्त सेवासदन मध्ये विद्यार्थिनींना उद्बोधन करताना प्रमुख पाहुणे व सेवासदन संस्थेचे कार्यकारिणी सदस्य , फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन चे सदस्य डॉ. राजीव प्रधान यांनी सांगितले की कर्करोग हा लगेच लक्षात येणारा आजार नसल्याने या रोगाला बळी पडण्याची शक्यता जास्त आहे. पण आधुनिक उपचारांनी या आजारावर मात करता येते. एफ. पी .ए .चे खजिनदार एन. बी. तेली, शाखाधिकारी श्री. सुगतरत्न गायकवाड, सौ. मनीषा वांगीकर, सौ. सुरेखा डबरे उपस्थित होते.