पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड आणि झपूर्झा यांच्यावतीने चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली.
पु. ना. गाडगीळ संस्थेचे क्षेत्रीय प्रमुख जितेंद्र जोशी, व्यवस्थापक हेमंतकुमार साई, श्री. गणेश इंगळे, चंद्रकांत कारवार , अनविर किणगी व सहकारी वर्ग उपस्थित होते. संस्थेच्या चिटणीस सौ. वीणा पतकी यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थिनींना प्रशस्ती पत्रक व बक्षीस देण्यात आले. कलाशिक्षक श्री. किरण जोशी, श्री. विलास कुलकर्णी, क्रीडाप्रमुख श्री . ज्ञानेश्वर काळे, सौ.कोर्टीकर यांनी सहकार्य केले.