26 जानेवारी प्रजासत्ताक दिन सेवासदन प्रशालेत उत्साहात साजरा
प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने सेवासदन संस्थेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते बालवर्ग, प्राथमिक, माध्यमिक , कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर नृत्ये सादर केली. आर.एस.पी. च्या विद्यार्थीनींनी कवायत संचलन करून मानवंदना दिली. प्रमुख पाहुणे श्री सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थिनींनी देशभक्ती गीत सादर केले.
कार्यक्रम प्रसंगी सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा सौ. शीला मिस्त्री, चिटणीस सौ. वीणा पतकी, सर्व विभाग प्रमुख डॉ सतीश कुलकर्णी, सौ. संगीता आपटे, सौ. संजीवनी नगरकर, लता पोटफोडे, सौ. स्वाती पोतदार, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचलन क्रीडाप्रमुख श्री. काळे सर यांनी केले
No comment